दिं.१८ नोव्हेंबर २०२४
ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मा.खा. तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीची आढावा बैठक भोलेनाथ राईस मिल कापसी येथे पार पडली.
यावेळी प्रा. अतुल भाऊ देशकर (माजी आमदार व विधानसभा प्रमुख) यांच्यासह विधानसभा संयोजक संतोष भाऊ तंगडपल्लीवार, तालुकाध्यक्ष अर्जुनजी भोयर,ता.महामंत्री सतिश बोम्मावार,ता.महामंत्री सचिन भाऊ तंगडपल्लीवार, विनोद धोटे,तुकाराम पा.ठिकरे, शरद सोनवाने, सावलीचे निखिल भाऊ सुरमवार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
मा.खा.अशोकजी नेते यांनी ब्रह्मपुरी विधानसभा निवडणुकीचा संपुर्ण भाजपा पदाधिकारऱ्यांसह आढावा घेत मार्गदर्शन करतांना ब्रह्मपुरी विधानसभा जिंकण्यासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार कृष्णाभाऊ सहारे यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक बूथ कार्यकर्ता यांनी सज्ज राहत
संघटनात्मक एकजुटीने मतदारांचा विश्वास निर्माण करत भाजप महायुतीचे उमेदवार कृष्णाभाऊ यांना निवडून आणुया व ब्रह्मपुरीत नवा इतिहास घडवण्याचा निर्धार करुया असे आवाहन मा.खा.नेते यांनी आढाव्यात केले आहे.
माजी आमदार प्रा. अतुल भाऊ देशकर यांनी भाजपा महायुतीचे सर्वसमावेशक नेतृत्व आणि विकासनिष्ठ धोरणे लोकांपर्यंत नेण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

