*नाविस पक्षाचे लोकप्रिय उमेदवार मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी एटापल्ली तालुक्यातील अनेक गावात घेतले कॉर्नर सभा.*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.मो. नं. 9420751809.
*नाविस पक्षाचे लोकप्रिय उमेदवार मा.राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय दौऱ्यात अनेक गावात कॉर्नरसभा घेण्यात आली. या प्रसंगी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास विद्यमान लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहेत यामुळे आता परिवर्तनातून विकास साधण्यासाठी आपण सर्वांनी माझे हात बळकट करावे अशी भावना यावेळी व्यक्त केली याप्रसंगी पदाधिकारी/कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!*

