पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोराडी:- कामठी विधानसभा मतदार संघात या विधानसभा निवडणुकीत जोरदार टक्कर बघायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाने यावेळी कामठी विधानसभा मतदार संघात भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली तर काँग्रेस ने भोयर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत या विधानसभेत बघायला मिळत आहे.
कामठी विधानसभा मतदार संघात लोधी समाजांसाठी भरपूर योगदान दिले असून कोराडी येथील विरांगणा राणी लक्ष्मीबाई लोधी यांचे भव्य स्मारक व त्या स्मारकाचे सौंदर्यीकरण हा त्याच्याच एक भाग आहे. लोधी समाजासमोर येणाऱ्या विविध अडचणीच्या वेळेला चंद्रशेखर बावनकुळे सक्षमपणे सामोरे गेले आहेत. समाजाच्या समस्या त्यांनी सोडवल्या आहेत. त्यामुळे लोधी समाजाच्या वतीने या मतदारसंघात चंद्रशेखर बावनकुळे यांना जाहीर पाठिंबा दिला जात असल्याचे विरांगणा अवंतीबाई लोधी बहुउद्देशीय संस्था कोराडी च्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

