अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १८ नोव्हेंबर:- काल राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोपा थंड झाल्या. त्यात सावनेर कळमेश्वर विधानसभा मतदार संघात तिहेरी लढत बघायला मिळत आहे. काल नेहरू मार्केट सावनेर येथे डॉ. अमोल रणजीत देशमुख यांनी दिनांक १७ नोव्हेंबरला जोरदार रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले.
यावेळी आयोजित जाहीर सभेत मंचावर उपस्थित वरिष्ठ पत्रकार सेवकरामजी राऊत, डॉ. सुचीका अमोल देशमुख, पूर्व शिवसेना तालुका प्रमुख मनोज कुईटे, कांतेश्वर तुमाने (खापा न.प. माजी नगरसेवक), रामभाऊ घाटोले (शिवसेना शहर प्रमुख उबाठा), हरीश बाली (पूर्व विधानसभा संगठण प्रमुख, शिवसेना) आणि अन्य गणमान्य व्यक्ति उपस्थित होते.
डॉ.अमोल रणजीत देशमुख यांनी प्रभावशाली आणि जोशीले भाषण दिले, त्यात त्यांनी आपली ईमानदारी आणि दृढ़ता ने जनतेचे मन जिंकले. त्यांनी माजी आमदार सुनील केदारवर ताशेरे मारले. सावनेर-कलमेश्वर क्षेत्राच्या दुर्दशे करिता केदार स्वतः जिम्मेदार आहे आणि समर्थकांना सुद्धा त्यांनी धारेवर धरले. डॉ.अमोल देशमुख यांनी सांगितले की, डॉ.आशिष देशमुख यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. पण ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले नाही व पलटले आणि तसेच खाप्याला दिलेल्या खोट्या आश्वासन पासून जनतेला अवगत करून दिले. सुनील केदार च्या कार्यकाळात चालत असलेल्या जबरदस्ती, गुंडागर्दी च्या साम्राज्याला खत्म करण्याची वेळ आलेली आहे. शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत भाषणाला चांगलीच रंगत आली होती.लोकांनी टाळ्या वाजवीत अमोल देशमुख यांचे स्वागत केले.
जेव्हा भाषण संपविण्याची वेळ आली तेव्हा जनतेने भाषण थांबवू नका असे म्हणत जोरदार नारेबाजी केली. चुनावी निशान “सीटी” असल्याकारणाने समस्त सीटी च्या आवाजाने परिसर गुंजले हे बदलाव च्या लहरी चे प्रतीक होते.
डॉ. अमोल रणजीत देशमुख यांनी रणजीत बाबू च्या कार्याला सामोर नेण्याचे आणि सावनेर क्षेत्राच्या तेजीने विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. जनतेच्या मनात राजनिती बद्दल खराब छबी पसरलेली आहे. ती मिटवण्यासाठी प्रयत्न करू आणि महात्मा गांधीजीच्या त्या शिक्षणाची आठवण करून दिली की दुनिया मध्ये बदलाव आणण्याकरिता पहिले स्वतः बदलण्याची गरज आहे.

