प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शहरातील शंकर नगर येथील सरस्वती हायस्कूल येथील एक दुःखद घटना समोर आली आहे. सरस्वती हायस्कूलची विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळून एक विद्यार्थीनीचा मृत्यू झाला असून 8 ते 10 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याच्या घटनेने खळबळ माजली आहे.
सरस्वती हायस्कूलची सहल वर्धा जिल्हातील बोरधरण येथे जात असताना सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास MH 40 Y 7350 या क्रमाकांची ट्रॅव्हल्स हिंगणी मार्गावर देवळी पेंढरी गावासमोर घाटात सर्वात मागे असलेली बस वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून खड्ड्यात कोसळली यात एक विद्यार्थी ठार झाला आहे.
सहल करीता निघालेल्या या बसमध्ये एकूण 52 विद्यार्थी, एक शिक्षक आणि एक केअर टेकर असे 53 जण होते. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांना गंभीर मार लागला असून यातील 44 विद्यार्थी एम्समध्ये तर 7 विद्यार्थी दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात एका 15 वर्षीय विद्यार्थीनीचा यात मृत्यू झाला. किरकोळ जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. लोकांनी अपघातग्रस्त बसमधील विद्यार्थ्यांना मदत केली.
या अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. अपघात होताच रस्त्यानी जाणाऱ्यांनी गर्दी केली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली होती.
पालकांची रुग्णालयाकडे एकच धाव:
सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या पाच बसेस विद्यार्थ्यांना घेऊन वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे जात असताना एक बस देवळी परिसरात खड्ड्यात कोसळली. अपघाताची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या पालकांनी एम्स रुग्णालयात धाव घेतली. अनेक पालक सकाळी रुग्णालयात पोहोचले. आपापल्या मुलाची विचारणा शिक्षकांना करीत होते. त्यामुळे रुग्णालयातही गोंधळ उडाला होता.
गावकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका:
हिंगणी रस्त्यावरून कवडसकडे जाताना पेंढरी देवळी गावाजवळ अपघातप्रवण वळण आहे. या वळणावर गेल्या तीन वर्षात 289 पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत. तर गेल्या महिन्यात 8 अपघात झाले आहेत. हा वळण रस्ता सरळ करण्यासाठी गावकऱ्यांनी वारंवार निवेदने देऊन प्रयत्न केले आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभाग यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम रखडलेले आहे. ‘हा रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा रस्ता बंद करू’ असा आक्रमक पवित्रा पेंढरी-देवळी गावकऱ्यांनी घेतला आहे.

