*कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु धर्मेंद्र तागडे व उदघाटक गायकवाड यांचे हस्ते कार्यक्रम पार*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ या दिवशी भारतीय संविधानाला ७५ वर्ष पूर्ण झाली आहे.या भारतीय संविधानाच्या अमृतवर्षा निमित्त दीक्षाभूमी देसाईगंज येथे अभ्यास पूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. धर्मेंद्र तागडे सर, उद्घाटक गायकवाड साहेब आरमोरी तर प्रमुख मार्गदर्शक मा. जयकुमार मेश्राम सर उपस्थित होते. याप्रसंगी मेश्राम सरांनी भारतीय संविधानाचे महत्व, व वैशिष्ट्ये यावर अभ्यासपूर्ण व विश्लेषणात्मक मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरीता बारसागडे, संचालन मनोज खोब्रागडे तर आभार प्रदर्शन आशिष घुटके यांनी केले. आयोजक सम्यक जागृत बौद्ध महिला समिती दीक्षाभूमी देसाईगंज व बुध्दिस्ट परिवार वडसा होते तर मारोती जांभूळकर सर, चंदू राऊत, कृणाल लांडगे, संजय मेश्राम, कविता मेश्राम, ममता जांभूळकर, लीना पाटील, यशोदा मेश्राम, रत्नमाला बडोले, प्रतिभा बडोले, प्रतिमा शेंडे, सुनिता नंदागवळी यांनी विशेष सहकार्य केले.

