प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/वर्धा:- 6 डिसेंबर रोजी देशभरातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखों अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. त्यामुळे मध्य रेल्वेने चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयानसाठी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वे विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर जाणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी 12 अनारक्षित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चार विशेष ट्रेन चालणार आहे. एक विशेष ट्रेन कलबुरार्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान चालेल. नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष चार गाड्यांची सुविधा असणार आहे.
यात विशेष गाडी क्रमांक 01262 नागपूर येथून 4 डिसेंबर रोजी रात्री 11:55 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 3:30 वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक 01264 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी सकाळी 8:00 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी रात्री 11:45 वाजता पोहोचेल, विशेष गाडी क्रमांक 01266 नागपूर येथून 5 डिसेंबर रोजी दुपारी 3:50 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसन्या दिवशी सकाळी 10:55 वाजता पोहोचेल. या गाड्यांना सेवाग्राम, वर्धा, पुलगाव स्थानकावर थांबणार आहेत.
विशेष गाडी क्रमांक 01262, 01264 व 01266 या विशेषसाठी सामान्य द्वितीय श्रेणीचे 16 डब्बे आहेत. विशेष गाडी क्रमांक 02040 नागपूर येथून 7 डिसेंबर रोजी दुपारी 01:20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 4:10 वाजता पोहोचेल. या गाड्या वर्धा, पुलगाव स्थानकांवर थांबेल. या गाडीची संरचना विशेष गाडी क्रमांक 02040 साठी सामान्य द्वितीय श्रेणीचे 16 डब्बे अशी आहे. नागरिकांनी विशेष रेल्वे गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन मध्ये रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

