उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- शहरात दुपारच्या सुमारास तारफैल परिसरात असलेल्या विजय नगर येथील बजरंग चौकामध्ये दाट लोकवस्तीत एका घरातून गॅस गळती होऊन गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर घराला भीषण आग लागली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर घराला भीषण आग लागली यावेळी परिसरातील नागरिकांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग नियंत्रणात येऊ शकले नाही. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर पाण्याचा मारा करून ती नियंत्रणात आणली. आग नियंत्रणात आणत असताना महानगर पालिकेचा एक कर्मचारी जखमी झाला आहे. या आगीची झळ परिसरातील 5 घरांना बसली. घरातील साहित्य जळून खाक झाले आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
गॅस कंपनीने मदत द्यावी: गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गॅस गळती व सिलिंडर स्फोट प्रकरणाची सविस्तर चौकशी करून गॅस कंपनीने नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

