राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. भिवंडीत एचआयव्ही (HIV) रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे एचआयव्ही नियंत्रणासाठी काम करणाऱ्या सरकारी यंत्रणा लोकांना जागरूक करण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे शहरातील एचआयव्ही रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे.
मुंबई येथील मजुरांचे शहर अशी ओळख असलेल्या भिवंडीत एचआयव्ही (HIV) रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात कारखान्यां सोबतच इतर अनेक कामे करण्यात येत असतात. त्यात मोठ्या प्रमाणात गोदाम असल्यामुळे कामगार आणि मजुरांसाठी महत्वपूर्ण ठिकाण आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक राज्यातून कामगार मजूर कामाच्या शोधात येथे येतात. यावेळी ते आपल्या कुटुंबाबरोबर येत नसून एकटे येतात.
असे मजूर कामगार त्यांच्या कुटुंबापासून दूर असल्यामुळे आपली लैंगिक इच्छापूर्तीसाठी हनुमान टेकडी येथील रेड लाइट एरियामध्ये जातात. जे आता एचआयव्हीचे हॉटस्पॉट बनले आहे. येथील 90 टक्क्यांहून अधिक वेश्या महिला एचआयव्ही बाधित असल्याची खळबळजनक माहिती रेड लाईट एरियामध्ये काम करणाऱ्या एका खासगी संस्थेने दिली आहे. येथे अनेक वेळा आजारांनी ग्रस्त महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले जाते. जनजागृतीचा अभाव आणि एचआयव्ही नियंत्रण संस्थांचे रेड लाईट क्षेत्राकडे दुर्लक्ष यामुळे शहरात एचआयव्हीचे प्रमाण वाढत आहे.
रेड लाइट एरियातील वेश्या महिलांच्या म्हणण्या नुसार, जेव्हा ते सुरक्षितेसाठी (कंडोमची) मागणी करतात तेव्हा त्यांचा छळ केला जातो. एका वेश्या महिलेने सांगितले की, ती गेल्या 10 वर्षांपासून एचआयव्हीने ग्रस्त आहे. त्यांनी सांगितले की त्यांना एचआयव्ही बद्दल जागरूक केले जात नाही. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत दिली जात नाही. अनेक वेश्या महिलांनी सांगितले की त्यांना या व्यवसायातून बाहेर पडून कुठल्यातरी कंपनीत काम करायचे आहे.
शहरातील एआरटी केंद्रांमध्ये 20 ते 22 वयोगटातील तरुण आणि 60 ते 65 वयोगटातील वृद्धांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर दर महिन्याला 30 हून अधिक नवीन एचआयव्ही बाधित रुग्ण एआरटी सेंटरमध्ये येतात. सध्या शहरात साडेतीन हजारांहून अधिक एचआयव्ही बाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर नियमित उपचार सुरू आहेत, तर इतर एचआयव्ही बाधित रुग्ण इतर प्रांतातील रहिवासी आहेत, शहर सोडून गेले आहेत किंवा त्यांचा मृत्यू झाला आहे.
एआरटी सेंटरच्या सूत्रांचे म्हणणे आहे की सरकारच्या जनजागृती करणाऱ्या एजन्सी काम करत नाहीत, त्यामुळे ही संख्या वाढत आहे. त्याचवेळी शहरात एचआयव्ही रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे आयजीएम उपजिल्हा रुग्णालयाने म्हटले आहे.
