पंकेश जाधव. पुणे जिल्हा प्रतिनिधी
गुन्हे शाखा युनिट १, पुणे शहर
दिनांक २०/०७/२०२२ रोजी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर व मा. पोलीस उप जायुक्त, गुन्हे, पुणे शहर यांनी पाहिजे व फरारी आरोपी यांना अटक करणे आवश्यक असून त्याप्रमाणे कारवाई करण्याकरीता आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पोनि श्री संदीप भोसले वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ यांनी पोलीस अभिलेखावरील रेकॉर्डवरील पाहिजे/ फरारी आरोपीची यादी देवुन पाहिजे/ फरारी यांचेबाबत माहीती प्राप्त करून अटक करण्याची कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
त्याप्रमाणे पाहिजे व फरारी आरोपी बाबतची माहीती घेता युनिटकडील अंगलदार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की समर्थ पो स्टे गुन्हा रजि नंबर १६१ / २०२२ भादवि कलम ३९९.४०२. आर्म अॅक्ट ४ (२५) महा पो अॅक्ट ३७ (१) (३) सह १३५ या गुन्ह्यातील ए एम लुटण्याचे तयारीत असलेली टोळीतील फरार झालेली तरुण मुले आज दिनांक २४/०९/२०२२ रोजी सकाळी १०/०० वा चे सुगा, त्यांचे मित्रास भेटण्यासाठी विठ्ठलपार्क मित्रमंडळ, गणिकबाग सिंहगड रोड, पुणे येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने लागलीच गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंगलदार यांनी नमुद ठिकाणी छापा टाकून प्राप्त बातमीप्रमाणे तीन विधिसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाहीसाठी समर्थ पोलीस ठाणेचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सहआयुक्त, श्री. संदीप कर्णिक, मा अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर श्री. रामनाथ पोकळे मा. पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर, श्री. श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली यूनिट-1 कडील पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लड़कत, शुभम देसाई, विठ्ठल साळुंखे यांनी केलेली आहे.