✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- येथील नालासोपारा येथून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्यामुळे सर्विकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील नालासोपारा पूर्वेकडील आचोळे डोंगरी येथील एकता वाल्मिकी वेल्फेअर सोसायटी चाळीत आपल्या आई वडिलानबरोबर राहणाऱ्या एका अडीज वर्षाच्या चिमुकल्याचा पाणी गरम करण्याच्या हिटरचा शॉक लागून दुर्दैवी रित्या मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील नालासोपारा पूर्वेकडील आचोळे डोंगरी येथील एकता वाल्मिकी वेल्फेअर सोसायटी चाळीत राहणाऱ्या अंश कागडा या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला हिटरचा करंट लागला त्यात अंशचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
लहान मूल हे चालण्यास लागले की ते कशाला पण हात लावू शकतात त्यामुळे महाराष्ट्र संदेश न्युज आपल्या सर्व वाचक वर्गाना अशी सूचना देते की आपण अशा धोकादायक वस्तूंना लहान मुला पासून दूर ठेवावे.

