हा नियोजित कट आहे याच्या मागचा मूळ सूत्रधार पोलिसांनी शोधावा वंचित बहुजन आघडीचे निवेदन.
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची समाज कंटकाने तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट तालुका व शहर कमेटीने मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मुंबई मार्फत हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांना निवेदन सादर केले.
परभणीत जातीयवादी समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ह आहे. डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिली घटना नाही. पोलिसांनी घडलेल्या घटनेची चौकशी करावी, कोंबींग ऑपरेशनच्या नावाखाली जनतेच्या सहनशीलतेचा अंत बघू नये! संविधानाचा अवमान करणाऱ्यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. संबंधित आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई करावी आणि हा नियोजित कट आहे याच्या मागचा मूळ सूत्रधार पोलिसांनी शोधावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे हिंगणघाट शहर अध्यक्ष रवि कांबळे व हिंगणघाट तालुका अध्यक्ष विवेक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मंगलाताई कांबळे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन महिला आघाडी), अशोक रामटेके (ज्येष्ठ नेते), आतिश दिवे, सिद्धार्थ जामनकर, अश्वजीत भगत,लोमेश बोबडे, प्रभाकर सुखदेवे, आनंद जनबंधू, इत्यादी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
