अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील अल्लिपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातील मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या आरोपीला अतीरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मंगेश प्रकाशराव हागे (दिघेकर) यास सुनावली 5 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा, कलम 506 भा.द.वी. मध्ये 2 वर्षे सश्रम कारावास व 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साध्या कारावासाची शिक्षा तसेच कलम ६ पोक्सो भा.द.वी. मध्ये 20 वर्षे सश्रम कारावास व 20 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 वर्ष साध्या कारावासीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. अशी माहिती सरकारी वकील ॲड दिपक वद्यै यांनी दिली आहे.
काय आहे ही घटना: पिडीत तरुणी हि घरात एकटी असतांना आरोपी मंगेश प्रकाशराव हागे (दिघेकर) याने अनाधिकृत घरात प्रवेश करुन जबरीने फिर्यादीसोबत शारिरीक संबंध केले व कोणाला सांगशील तर जिवे मारुन टाकिन अशी धमकी दिली. त्यानंतर फिर्यादिला लग्न करण्याचे आमिष देवुन वेळोवेळी शारिरीक संबंध स्थापित केले यातून पिढीत तरुणीला 6 महिन्याची गर्भधारणा झाली. तसेच तिने लग्न करण्याचे म्हटले असता आरोपीन नकार दिला होता. यावरून पिडित तरुणीने आरोपी विरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवली होती.
पोलिसांना तक्रार नोंद करत आरोपी विरोधात विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून तपास करून आरोपी विरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून प्रकरण न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने सर्व पुरावे आणि पिढीत तरुणीची साक्ष बघून आरोपीला शिक्षा सुनावली.

