संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- सविस्तर माहिती खालील प्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय संसदेत बोलताना आपत्तीजनक व अपमान करणारी भाषा तथा शब्द प्रयोग वापरून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ राजुरा काँग्रेसच्या वतीने संविधान चौक राजुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन जोरदार घोषणाबाजी करीत अवमानकारक वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी काँग्रेस नेते माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, अशोकराव देशपांडे, मनोवैज्ञानिक प्राचार्य डॉ. सत्यपाल कातकर, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, गजानन भटारकर, एड. चंद्रशेखर चांदेकर, अभिजित धोटे, विनोद झाडे, शंकर बोबडे, सुधाकर उईके, बबन ताकसांडे, पंढरी चन्ने, मतीन कुरेशी, भुषण बानकर, प्रणय लांडे, इरशाद शेख, अशोक राव, मधुकर झाडे, संघपाल देठे, संतोष मेश्राम, इरफान पठाण, रवी बावणे, आदित्य ठाकरे, परिश्रीत खामणकर, शुभम गिरसावळे, पिंटू टेकाम यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

