अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दरवर्षी 22 डिसेंबर रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने स्थानिक भारत विद्यालयात गणित दिवस साजरा करण्यात आला.
श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यासाठी तसेच लोकांना गणिताचे मानवतेच्या विकासातील महत्त्व याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे हा गणित दिनाचा उद्देश आहे, अशी माहिती गणित शिक्षक श्रीकांत राडे यांनी दिली. यावेळी मुख्याध्यापक राजू कारवटकर, उप मुख्याध्यापक हरीश भट्टड, पर्यवेक्षक शिक्षक श्रीकांत राडे, शिपाई शरद बोरकर, जगदीश झाडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक राजू कारवटकर यांनी थोर गणित शास्त्रज्ञ रामानूजन यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण केली.

