पिकांवर लाल्या व धुयारीच्या प्रादुर्भावाने शेतकरी सापडला संकटात. माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती.
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट २८:- खरीपच्या हंगामातील कपाासीच्या पिकावर लाल्या नावाच्या व तुरीवर पडलेल्या धुयारीच्या प्रकोपामुळे उभी पिके नष्ट झाली असुन सरकारने शेतक-याच्या शेताचा सर्व्हे करून आर्थिक मदत देण्याबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली.
खरीपच्या हंगामातील कपासीच्या पिकावर लाल्या रोगाने झाडाची पाने लाल पडुन पिक धोक्यात आली आहे. तसेच तुरीचे पिकावर 15 दिवसा आधी धुयारीचा प्रार्दभाव झाल्यामुळे उभ्या तुरीचे झाडे सुकु लागली आहे. या निर्सगाच्या प्रकोपामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होत असून नापिकी होण्याची दाट शक्यता आहे. कापसीच्या पिकावर ही लाल्याच्या प्रार्दुभावमुळे पाणे लाल पडुन उभी पिके नष्ट झाले आहे. त्यामुळे काही शेतक-यांनी उभ्या पिकावर रोटावेटर मारून पिक नष्ट केलेले आहे. तर काहीना पराटया उपडुन गहू, चना, ज्वारी ईत्यादि पिकाची लागवड करण्यास जमीन तयार केली आहे. तुरीचे पिक इतके चांगले होते की, १५ दिवसा आधी फार मोठया प्रमाणात धुयार पडल्यामुळे उभे पिक सुकुन गेले आहे. त्यामुळे शेतक-यावर नापिकीची सावट निर्माण दिसुन येत आहे. तसेच रब्बी हंगामातील हरबरा पिकावर मर नावाचा रोग आल्यामुळे झाडे सुकुन गेली आहे. तरी सरकारणे शेतक-यांच्या शेतात तातडीने सर्व्हे करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती करत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

