मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*कुरखेडा : -* वाचन संस्कृती जोपासण्यासाठी व विद्यार्थांना वाचनाची आवड लागावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व शासनमान्य सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवडा उपक्रमा निमित्त कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथे नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमासाठी विध्या विकास हायस्कूल व जि.प. शाळा देऊळगाव येथील विद्यार्थी उपस्थित होते. सोबतच साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांनी नवसंजीवनी सार्वजनिक वाचनालयाला क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांची प्रतिमा भेट म्हणून दिली त्यावेळी वाचनालयाच्या सदस्या निर्मलाबाई ठलाल,शिक्षक मोहनलाल देशमुख, जेष्ठ नागरिक श्रावण जी ठलाल प्रामुख्याने उपस्थित होते.विद्यार्थांसोबत संवाद साधताना साहित्यिक संगीता ठलाल यांनी विद्यार्थांना पुस्तक वाचनामुळे माणसात परिवर्तन होतो,माणूस वाचनाने घडत असतो,वाचनाचे अनेक फायदे आहेत म्हणून वाचन संस्कृती जपणे ही आज काळाची गरज आहे म्हणून वाचन संस्कृती महाराष्ट्राचा या प्रेरणादायी उपक्रमा बद्दल शासनाचे ही त्यांनी आभार मानले.

