महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छत्तीसगढ:- राज्यामधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील सक्ती जिल्ह्यातील देवरघाटा गावातील आचारीपाली येथील 16 वर्षीय 11 वी शिक्षण घेत असलेल्या एका मुलीने अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वत:ची जीभ कापून ती भोले बाबाला अर्पण केली. एवढ्यावरच न थांबता तिने स्वत:ला मंदिरात कोंडून घेतले आणि ध्यानाला बसल्याचा घटनेने संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अचरीतपाली येथील आरुषि चौहान नावाच्या मुलगी आपल्या मामाच्या घरी देवरघटा मध्ये राहून शिक्षण करत आहे. तिने सोमवार सकाळी एक खळबळजनक पाऊल उचलत.आपला गावाजवळ असलेल्या भोले बाबा मंदिर मध्ये आपली जीभ कापून देवाला अर्पन केली आहे. यानंतर तिने मंदिराचे दरवाजे बंद करून साधना मध्ये लीन झाली. जीभ कापल्या नंतर मंदिर परिसरात सर्वत्र रक्त पसरले आहे. यापूर्वी या विद्यार्थिनीने आपली जीभ कापण्यापूर्वी दोन पानाची चिट्टी लिहून बाहेर ठेवली आहे. यात लिहले आहे की, कुणाचा ही आवाज नको व्हायला पाहिजे, गाड़ी किंव्हा मनुष्याचा तर बिल्कुल नाही आवाज नाही आला पाहिजे. पुढे लिहल आहे की, मी उठली तर सर्वाची मृत्यू होणार, त्यात माझे आई वडील हो की अन् कोणी अधिकारी.
या घटनेची माहिती स्थानीक पोलीसांना मिळताच त्यांनी तडकाफडकी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गावातील लोकांनी पोलिसांना घेराव घालत मंदिरात जाऊ दिले नाही. हे प्रकरण दाभ्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडले. सोमवारी सकाळी 7.00 वाजता मुलीने तिची जीभ कापून ती घराजवळील तलावाच्या काठावरील भोले बाबाच्या मंदिरात अर्पण केली. यावेळी या मुलीने एक चिठ्ठीही लिहिली.
यावेळी मुलीच्या पालकांना पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समजावून तिला रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली, मात्र पालकांनी स्पष्ट नकार दिला. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक उपस्थित आहे. तरुणीने असे पाऊल का उचलले याची चौकशी पोलिस स्थानिकांकडे करत आहेत.

