मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
दिनांक: ३० डिसेंबर २०२४
भामरागड : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्य नोंदणी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भामरागड तालुका ग्रामीण व शहर शाखेच्या वतीने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
आज सोमवार, दिनांक ३० डिसेंबर २०२४ रोजी भाजप कार्यालय, भामरागड येथे झालेल्या या कार्यशाळेचा उद्देश नव्या सदस्यांना पक्षाच्या विचारसरणीशी परिचित करून देणे व अभियानाला गती देणे हा होता.
कार्यशाळेचे उद्घाटन *भाजप अहेरी तालुका अध्यक्ष विनोद अकनपलीवार* यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हटले, “सदस्य नोंदणी अभियान ही भाजपसाठी फक्त संख्या वाढवण्याची प्रक्रिया नसून ती पक्षाच्या मूलभूत तत्त्वांना दृढ करण्याची संधी आहे. नवीन सदस्यांना पक्षाच्या कार्यपद्धती व विचारांची सखोल माहिती देऊन त्यांना पक्षाशी जोडणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे.”
तसेच, अभियानाला अधिक गती देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवत झोकून देऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यशाळेत प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष सुनील बिस्वास, तालुकाध्यक्ष अर्जुन आलाम, अहेरी माजी ता. महामंत्री साईनाथ औतकर, तालुका महामंत्री तापेश तालुका उपाध्यक्ष जाधव हलदार,नवीन शहर अध्यक्ष प्रबीर बिश्वास युवा मोर्चा अध्यक्ष पवित्र मल्लिक ,जिल्हा कार्यकरणी सदस्य दशरथ मांजी, दिनेश घोषरे, लक्षमन वड्डे, मालय्या नीलम, आदींचा समावेश होता.
कार्यशाळेने भामरागड शहर व ग्रामीण भागातील संघटनात्मक कार्याला नवीन उर्जा देऊन सदस्य नोंदणी मोहिमेला अधिक बळकटी मिळवून देण्याचा विश्वास दिला. व 11 गावातील नवीन लोकांना पक्ष प्रवेश करून घेतला व त्यांच्या सन्मानाने स्वागत करण्यात आले.

