मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या क्रीडा व कलागुणांचा विकास घडवून व त्यांचे प्रदर्शन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती एटापली यांच्या संयुक्त विद्यमानाने सन 2024-25 या शैक्षणिक क्षेत्रात तालुकास्तरीय शालेय बालकला व क्रीडा संमेलन दिनांक 2 जानेवारी रोजी जिल्हा परिषद हायस्कूल एटापल्ली च्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.या क्रीडा संमेलनाचे उद्घाटन तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला हेमंत गांगुर्डे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी एटापली यांच्यासह ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते. सदर कला व क्रीडा संमेलन दोन तीन व चार जानेवारी 2025 पर्यंत चालणार असून अशा प्रकारच्या क्रीडा संमेलनामुळे विद्यार्थ्याच्या कलागुणांचा विकास होऊन त्यांच्या प्रगतीस वाव मिळतो असे मार्गदर्शन तनुश्रीताई धर्मराव आत्राम सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ यांनी उपस्थितांना केले.

