मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे श्रेय जाते बाळशास्त्री जांभेकर यांना, ज्यांनी 1832 साली ‘दर्पण’ हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. त्यामुळे वर्धा येते संरक्षण समिती वर्धा जिल्हाच्या वतीने पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्रकारितेमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या पत्रकाराचा सन्मान करण्यात आला.
संरक्षण समिती वर्धा जिल्हाच्या वतीने पत्रकारिते मध्ये उत्कृष्ट कार्य केल्या बद्दल हिंगणघाट येथील पत्रकार रवि येनोरकर यांचा सत्कार करण्यात आला. रवि येनोरकर पत्रकारितेने समाजच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. तसेच कित्येक प्रश्नों मार्गी लावले. सोबतच कित्येक समस्या वर देखील त्यांनी लिखाण केले. अश्या उदयोमुख पत्रकारचां संरक्षण समिति वर्धा जिल्हाचा वतीने सम्मानित करून पत्रकारच्या कार्याची प्रशंसा केली.
आमचे सहकारी मित्र आणि धडाडीचे हिंगणघाटचे पत्रकार रवि येनोरकर यांच्या कार्याची दखल घेऊन वर्धा येथे आयोजित पत्रकार संरक्षण समिती वर्धा ने पत्रकार दिनाचे औचित्य साधूनत्यांचा सत्कार केल्याप्रसंगी सर्व पत्रकारांनी त्याचा आभार मानून सत्कार मूर्तिचे अभिनंदन केले.

