मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- ६ जानेवारी १८३२ रोजी आपल्या विसाव्या वाढदिवशी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना ‘दर्पण ‘हे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. त्यामुळे राज्यात हा दिवस पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्यात येत असत. ‘लोकशाही व्यवस्थेत स्वतंत्र आणि जबाबदारीने काम करणाऱ्या पत्रकारांचा पत्रकार दिन अथवा पत्रकारिता दिन हा सन्मानदिन असतो. हा दिवस म्हणजे लोकशाहीच्या मूल्यांचे पालन करत माध्यमे जी महत्वपूर्ण भूमिका बजावतात त्याचे स्मरण करण्याचा आणि ते स्फुरण अंगीकृत करण्याचा दिवस असतो. सुदृढ लोकशाहीसाठी मुक्त आणि निष्पक्षपाती माध्यमांची गरज असते. अशी माध्यमे लोकशाहीची आधारस्तंभ असतात. त्यामुळे पत्रकार दिनाचे औचित्य साधून हिंगणघाट येथील ज्येष्ठ पत्रकार श्री भास्करराव कलोडे यांचा वर्धा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने गौरव करण्यात आला.
वर्धा शहरातील दादाजी धुनिवाले सभागृहात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोला मल्यार्पण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. खासदार अमर काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्याला माजी खासदार रामदास तडस, नागपूर श्रमिक पत्रकार संघांचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, नागपूरचे पत्रकार सुनील तिवारी, दत्ता मेघे हॉस्पिटलचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सुधीर दिवे, डॉ. सुरेश चोपडे व मान्यवर उपस्थित होते. यावेळी भास्करराव कलोडे यांना मानपत्र, स्मृतीचिन्ह शाल श्रीफळ देऊन प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ पत्रकार श्री भास्कररावं कलोडे हें मागील 35 वर्षापासून पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून विविध विषयांचे चिकित्सक अभ्यासक अशी त्यांची ख्याती आहे. काही काळ त्यांनी राजकारणात भाग घेऊन हिंगणघाट नगर पालिकेचे नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती म्हणून म्हणून त्यांनी कार्य केले आहे. त्यांना मिळालेल्या चौथ्या स्तंभ पुरस्काराने हिंगणघाट शहरातील पत्रकारितेचा आज सन्मान झालेला आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल हिंगणघाट शहरातील आणि तालुक्यातील अनेक पत्रकारांनी त्यांचे अभिनंदन केले.

