निकृष्ट दर्जाचे घनकचरा व्यवस्थापनाचे बांधकाम आमदार देशमुख यांनी थांबवले.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर ६ जाने:- सावनेर तालुक्यातील वाकी या गावात घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात कचरा साठविण्याची टाक्याचे जे बांधकाम सुरू होते, ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते. बांधकामासाठी जो मसाला वापरण्यात येत होता त्यात सिमेंट नव्हते. कोणताही पायवा न खोदता, फक्त भिंत बांधून टाके बांधण्याचे थातूरमातूर काम सुरू होते. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी सावनेर-कळमेश्वर क्षेत्राचे भाजपाचे आमदार डॉ आशिष देशमुख यांना या संदर्भात तक्रार केली. क्षणाचाही विलंब न करता डॉ.आशिष देशमुख वाकी स्थळावर दाखल झाले. त्यांनी तात्काळ बिडीओ आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्या स्थळावर बोलवले. हे काम ताबडतोब बंद करून त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्यासंदर्भात सर्वांसमक्ष आदेश दिलेत.
यावेळी विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा चालणार नाही. माझ्या क्षेत्रात निकृष्ट दर्जाची कामे खपवून घेतली जाणार नाहीत असे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी यावेळी निक्षून सांगितले. बांधकामाची पाहणी करतेवेळी अशोक धोटे, रोहित मुसळे, किशोर चौधरी, किशोर मुसळे, नाना गुडधे, प्रमोद पिंपळे, प्रशांत खोरगडे, अनंता पडाळ, अतुल पाटील, राजू पांडे तसेच भाजपाचे अनेक नेते, कार्यकर्ते व गावकरी यावेळी उपस्थित होते.
