संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी 1832 रोजी दर्पण हे साप्ताहिक सुरू करून मराठी पत्रकारितेची मूहुर्तमेळ रोवली. त्यानिमित्ताने राजुरा पत्रकार संघ तथा राजुरा पत्रकार असोसिएशन च्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी २०२५ रोजी सुपर मार्केट हॉल राजुरा येथे पत्रकार दिन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्याचे उद्घघाटन मुरली मनोहर व्यास, केंद्रीय प्रतिनिधी मराठी पत्रकार परिषद मुंबई यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, प्रमुख अतिथी माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अविनाश जाधव, अनिल बाळसराफ, डॉ.उमाकांत धोटे, प्रा.बी.यु.बोर्डेवार, श्रीकृष्ण गोरे सह मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने एबीपी माझा चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी श्री सारंग पांडे, टीव्ही-9 चे निलेश डहाट, दैनिक महासागर चे सय्यद जाकीर, दैनिक नवराष्ट्राचे साहिल सोळंके, दैनिक पुण्यनगरीचे मंगेश बोरकुठटे, दैनिक भास्कर चे मंगेश श्रीराम उपस्थित होते.

