पंचायत समिती हिंगणघाट येथे आयोजित पाणी टंचाई सभेत निर्देश
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज स्थानिक पंचायत समिती हिंगणघाट येथील सभागृहात हिंगणघाट विधानसभा व देवळी विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट तालुक्यातील गावांची पाणी टंचाई बैठक आमदार समीर कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली तथा आमदार राजेश बकाणे व मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन रहमान जिल्हा परिषद वर्धा यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी आमदार कुणावार यांनी विस्तृत आढावा घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हिंगणघाट तालुक्यातील प्रत्येक गाव हे पाणी टंचाई मुक्त असावे अशी भावना व्यक्त करत पुढील दोन वर्षांत पाणी टंचाईची बैठक घेण्याचे कामचं पडू नये असा आपण सर्व मिळून प्रयत्न करू असे आवाहन सुध्दा याप्रसंगी केले.
यावेळी आमदार बकाणे यांनी सुध्दा आपल्या भागातील येणाऱ्या गावांचा आढावा घेत योग्य ते निर्देश संबंधिताना दिलेत. या बैठकीला उपविभागीय अधिकारी हिंगणघाट, तहसीलदार हिंगणघाट गटविकास अधिकारी पंचायत समिती हिंगणघाट, उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा हिंगणघाट आदी मान्यवर उपस्थित होते.

