अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व शासकिय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला यांच्या मध्ये असलेले प्रवेशद्वार उघडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या कार्यालयात जवळपास २ महीनेपासुन वारंवार पत्रव्यवहार करत आहेत. यावर रितसर उत्तर वैद्यकीय अधिक्षक कार्यालयातून देण्यात आले.
सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे मागचे प्रवेशद्वारचा भाग हा सुनसान आहे रात्रीच्या वेळेस या भागात फिरणारे असामाजिक तत्व व ९० टक्के जनता ही मेडीकोलीगल रुग्णाचे नातेवाईक यांचा समावेश असतो. त्यामुळे अशा सुनसान भागात मर्डर किंवा रेप सारखे अनुसुचित प्रकार घडू शकतात.
यवतमाळ येथील मेडीकल कॉलेज मध्ये असे प्रकार घडलेले आहेत त्या धर्तीवर कुठलीही घटना घडून नये म्हणून सदर प्रवेशद्वार हे रात्रपाळीत बंद ठेवण्यात आले. असे रूग्णालय प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले. तसेच रूग्णालय प्रशासनाच्या वतीने सुरक्षा कर्मच्याऱ्यांची मागणी करुन ५६ सुरक्षा कर्मचारी मंजुर करुन घेतले आहेत. अंदाजे १५ जानेवारी पर्यत भरती होण्याची शक्यता आहे.
एका गेटवर तीन शिफटमध्ये ४ सुरक्षा कर्मचाऱ्यांची गरज भासते, त्यामुळे अंदाजे १५ तारखेनंतर हे गेट २४ तास सुरु होणार आहे. असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय च्या अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये यांना सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी आंदोलनाचा इशारा देताच सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाने नरमायची भुमिका घेत सदर प्रवेशद्वार लवकरच उघडणार असल्याचे सांगितले.

