पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 53 वे विदर्भ प्रांत अधिवेशन 28, 29, 30 जानेवारी 2025 रोजी संघभूमी, दीक्षाभूमी नागपूर येथे संपन्न होणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर हे अधिवेशन नागपुरात होत आहे आणि विदर्भाच्या इतिहासात हा सर्वात मोठा अधिवेशन नागपुरात होणार आहे. या अधिवेशनात विदर्भातील 550 महविद्यालयातून 2000 विद्यार्थी प्रतिनिधि सहभाग घेणार आहे.
येणाऱ्या विद्यार्थी प्रतिनिधिच्या स्वागतासाठी नागपुरातील कार्यकर्ता उत्सुक आहे, या अधिवेशनला ऐतिहासिक करण्यासाठी सर्व कार्यकर्ता समर्पित प्रयत्न करत आहे. अधिवेशनाच्या वातावरण निर्मिती करिता प्रत्येक महाविद्यालयात पोस्टर विमोचन करण्यात येत आहे. नागपुरातील सामान्य जनता सुद्धा या अधिवेशना करिता सकारात्मक प्रतिसाद देत आहे.
या अधिवेशनात समाजातील प्रत्येक घटकाचा समावेश व्हावा त्यामुळे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता समाजातील प्रत्येक घटका कडून लघुनिधी संकलन करण्यात येत आहे एका छोट्या दुकानदार पासून तर मोठ्या व्यापारी सुद्धा या लघु निधी संकलनाच्या माध्यमातून सामाजातील प्रत्येक वर्ग सहभाग घेत आहे.
