संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर 12 जाने:- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रविनगर, नागपूर यांचे तर्फे अगस्त्या फॉउंडेशन द्वारा आयोजित खेळातून विज्ञान या कार्यशाळेचे उदघाट्न स्वरस्वती महाविद्यालय सावनेर च्या प्राचार्या निता वडस्कर यांनी दीप प्रज्वलन करून केले.
यावेळी खेळातून विज्ञान या कार्यशाळेस अगस्ता इंटरनॅशनल फाऊंडेशन चे विभागीय कोऑरेडीनेटर राजेश लोखंडे, प्रीती तोडकर यांनी खेळातून विज्ञान यांत अनेक संकल्पना स्पष्ट केल्या. त्यात हवेचा दाब, स्थितीक ऊर्जा, न्यूटनचा गुरुत्वाकर्षण शक्तीचा नियम, मानसिक ताणतणाव, विविध खेळ, भूमितीच्या आकृत्या, घड्याळ्याच्या फिरत्या काट्यामुळे निर्माण होणारे विविध कोण अश्या नव नवीन संकल्पना समजावून सांगितल्या.
या कार्यशाळेत श्रीकृष्ण अध्यापक विद्यालय सावनेर व स्वातंत्र संग्राम सेनानी बालमुकुंदजी गुप्ता अध्यापक विद्यालय नरखेड येथील 125 छात्र अध्यापक अध्यापिकाचार्य यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास श्रीकृष्ण अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य विजय गणोरकर, प्रा. नीता कुंभारकर, प्रा. हेमलता चोपडे, प्रा.दर्शना राऊत, प्रा. अश्विनी ताजने, प्रा. राहुल गहुकर, प्रा. मुरलीधर ढगे , बालमुकुंद गुप्ता अध्यापक विद्यालय नरखेडचे प्रा. लीलाधर महाजन, प्रा. शिरीष खोबे, प्रा. राजेश महंत, प्रा. महादेव नवघरे, प्रा. संगीता चिकनकर यांची उपस्तीथी होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता विनोद जुनघरे, प्रभाकर महाजन, दिलीप घुगल यांनी परिश्रम घेतले.

