संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 13 जाने:- महान तत्वज्ञ व समाजसुधारक स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजुरा येथे राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना विध्यार्थ्यांना या मार्गदर्शनातून मिळणाऱ्या ज्ञानाचा आपण सकारात्मक दृष्टीने सदैव विचार करावा व आपल्यातील क्षमता ओळखून योग्य दिशा मिळावी. यासाठी संस्थेने आयोजीत केलेल्या कार्यक्रमाचा फायदा हा विध्यार्थाना ध्येय निश्चित करून यश संपादन करण्यासाठी निश्चितच होईल असे प्रतिपादन सुब्बरायडू अय्यागिरी, सहाय्यक कार्यकारी संचालक, दालमिया ग्रुप यांनी आपल्या उदघाटनीय भाषणात केले. तर संस्थेच्या प्राचार्य कु. पी. एच. दहाटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विविध उदाहरण दाखले देवून आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन जिद्द चिकाटी व तंत्रज्ञानाची मदत घेऊन यशस्वी कसे होता येईल याचे धडे देऊन विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सर्व साधारण प्राचार्य पी. बी. डोंगरवार यांनी या शासनाच्या कार्यक्रमाचा हेतू व संस्थेमार्फत राबवत असलेल्या योजनाची माहिती सांगितली तसेच या कार्यक्रमात मार्गदर्शनाच्या लाभ घ्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी बादल बेले, राज्यध्यक्ष नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विध्यार्थ्यांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रशांत भीमनवार, सी. एस. आर. हेड दालमिया सिमेंट, नारंडा व यशस्वी युवा उद्योजक इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत जागतिक युवा दिन सोहळा पार पडला.
या कार्यक्रमात यशस्वी युवा उद्योजक म्हणून बादल नीळकंठ बेले, सागर रामदास गुरूनुले, जोया शेख, प्रवीण बोंडे व प्रावीण्य प्राप्त विध्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक व कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष शेंडे यांनी केले तर आभारप्रदर्शन दर्शना चव्हाण यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

