राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात महिला मुलीवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मुली महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच संतापजनक घटना मुंबई येथील डोंबिवली मधील दावडी येथून समोर आली आहे. येथे शिकवणीसाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या चिमुकल्या मुलीवर शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेच्या भावानेच अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. वैभव सिंग असे आरोपीचं नाव असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, 8 वर्षांची मुलगी ही एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या शिक्षिकेकडे शिकवणी घेत होती. ती रोज रात्री 8 ते 9 या वेळेस जात होती. घटनेच्या दिवशी 15 जानेवारी रोजी नेहमी प्रमाणे चिमुकली मुलगी ही शिकवणीला गेली होती. यावेळी तिच्यासोबत तिच्या मैत्रिणी सुद्धा होत्या. पण शिकवणी घेणारी शिक्षिका घरी नव्हती. तिचा नराधम भाऊ वैभव सिंग हा घरी होती. आरोपी वैभवने या संधीचा फायदा घेत पीडित मुलीला पकडलं आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेला. त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.
घडलेल्या प्रकारानंतर पीडित चिमुकली घाबरलेल्या अवस्थेत घरी आली. तिने सगळी हकीकत आपल्या आई-वडिलांना सांगितली. घडलेल्या प्रकारामुळे तिचे आई-वडिल पुरते हादरले. त्यांनी तत्काळा मानपाडा पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत आरोपी वैभव सिंगला बेड्या ठोकल्या असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास मानपाडा पोलीस करत आहे.

