आसमा सय्यद, पुणे जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एका महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी बरोबर ओळख वाढवून आईशी भेट करुन देतो, असे सांगत घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी या नराधमाने लपून शारीरिक संबंधांचे चित्रीकरण केले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने 2 महिने तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 18 वर्षीय पिडीत मुलीने फिर्याद दिली असून. कोंढवा पोलिसांनी 19 वर्षीय पिडीत विद्यार्थिनीच्या वर्गमित्राला बेड्या ठोकल्या आहे.
प्राप्त माहितीनुसार, पिढीत मुलगी आणि आरोपी तरुण हे एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी तरुणाने पिढीत मुलीला आपल्या आईची भेट करुन देतो, असे सांगून तिचा विश्वास संपादन करुन आपल्या घरी आणले. यावेळी घरी कोणीही नव्हते. या संधीचा फायदा घेऊन तरूणाने तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले. तिच्या नकळत शरीरसंबंध ठेवतानाचा व्हिडिओ बनवून पिढीत मुलीला दाखविला. त्यानंतर मी ज्यावेळी बोलवीन, त्या वेळेस मला भेटायचे व याबद्दल कोणासही काही सांगायचे नाही, असे म्हणून तिला धमकाविले.
फिर्यादी कॉलेजला गेले असताना फिर्यादीला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन कॉलेजमधून आरोपी तिला दुचाकीवरुन लॉजवर घेऊन जात. तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवत व नंतर कॉलेजला आणून सोडत असत. कोणालाही काही न सांगण्याची धमकी देत. हे सर्व नोव्हेंबर 2024 ते 12 जानेवारी 2025 दरम्यान आरोपीच्या घरी व लॉजवर घडली. फिर्यादी खूप घाबरलेली असल्याने तिने हे कोणाला सांगितले नाही. 12 जानेवारी रोजी फिर्यादीने कॉलेजमध्ये आरोपीने सांगितलेले ऐकले नाही म्हणून कॉलेजच्या लायब्ररीमध्ये कानाखाली मारुन तिच्या हातातील बॅग फेकून मारली. गेली दोन महिने सुरु असलेल्या हा शारीरीक छळ असह्य झाल्याने या मुलीने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली.

