प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.16:- ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा दिवस राज्य क्रिडा दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रिडा संकुल येथे विविध खेळाचे प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करुन क्रिडा दिन साजरा करण्यात आला.
यावेळी प्रियदर्शनी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सोनाली शिरभाते- सुर्यवंशी, जिल्हा क्रिडा अधिकारी आशा मेश्राम, राज्य क्रिडा मार्गदर्शक किशोर बोंडे यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त तसेच सहभाग नोंदविलेले राष्ट्रीय खेळाडू यामध्ये लुधीयाना पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कराटे स्पर्धेत व्दितीय क्रमांक प्राप्त केल्या मानसी गाठे, तृतीय क्रमांक प्राप्त केलेल्या पियुष हवलदार यांचा तसेच जिल्ह्यातील 25 राष्ट्रीय खेळाडूंना सन्माचिन्ह, पदक व खाशाबा जाधव यांचे जीवनचरीत्र असलेले पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे संचालन क्रिडा अधिकारी संदीप खोब्रागडे यांनी केले तर आभार अनिल निमगडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भोजराज चौधरी, विश्वास बोकडे, रवी काकडे, अविनाश देसाई, रुचिका टेंभरे, वर्षा चंदनखेडे, वर्षा चंदनखेडे, अशोक पेढेकर यांनी परिश्रम घेतले.
