प्रतिबंधित नायलॉन मांज्या विक्रेत्यांवर थातूरमातूर कारवाई
अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- दरवर्षी नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना समोर येत असतात. यंदा या समस्येने गंभीर रूप घेतले असून, एका निष्पाप युवकाचा गळा चिरल्याने तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १४ जानेवारी रोजी घडली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यात नायलॉन मांजाचा अवैध व्यवसाय जोमाने फोफावला असताना प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्याचे चित्र आहे. या व्यवसायात सहभागी असलेल्या व्यक्तींवर आणि त्याचा वापर करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करणे गरजेचे झाले आहे. जीवघेणा व प्रतिबंधीत नायलॉन मांजाने गळा चिरल्याने एका ३५ वर्षीय किरण प्रकाश सोनोने नामक युवकाचा मंगळवारी जीव गेला. सदर घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरच्या उडाणपुलावर घडली. पोलिस प्रशासन आणि अकोला महापालिकेने जर तातडीने पाऊले उचलली असती तर या युवकाचा जीव वाचला असता.
जिल्हाधिकारी अजित कुंभारे यांनी कारवाईचे आदेश देवून पोलिस व महापालिका प्रशासनाने डोळे झाक केली. त्यामुळेच अकोल्यात एका निरपराधाचा बळी गेला आणि अनेकजण जखमी होऊन उपचार घेत आहेत. मोनोकाइट-फायटर, चायना मोनोकाइट, एसके, हिरोप्लस, डॉलफीन या नावाने नायलॉन मांजा अकोल्यात मोठ्या प्रमाणात विकल्या गेला आहे. नायलॉन व चायनीज मांजा मूळे निरपराध नागरिकांचे बळी जात आहे. त्यात अकोल्यातील युवकही निष्पाप गेला. याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि मृत सोनोनेच्या परिवाराला १ कोटी रुपयांची मदत करावी. प्रतिबंधीत मांजाची खुले आमविक्री होत असतांना प्रशासन डोळेझाक करीत आहे. सम्पूर्ण शहरात सर्रासपणे विक्री होत असून चायनीज मांजा खेड्यापात पोहचला असून नागरिकांप्रमाणे पशु पक्षी सुध’ जीव गमावत आहे. नागरिकांचा जीव घेणारा मांजा ताबडतोब जप्त करून संबंधीतांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. व प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे मरण पावलेल्या कीरण सोनने व त्यांच्या कुटुंबायांना न्याय द्यावा. अन्यथा तिव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी व समिर खान, सतिश तेलगोटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

