पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- सती माता शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव, श्रद्धेय स्व डॉ. मोतीरामजी उपाख्य अण्णासाहेब उमाठे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधुन त्यांच्या जन्म शताब्दी (1923-2024) समारंभाचे उद्घाटन उमाठे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या वतीने शुक्रवार, दि. 17 जानेवारी रोज संध्याकाळी 5.00 वाजता कॉलेज ऑफ मल्टिडिसिप्लिनरी स्टडीज ओंकारनगर, नागपूर येथे संपन्न झाला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासावर मंथन व्हावे व तरूण पिढिला खऱ्या इतिहासाची जाणीव करून देवून काही बोध घेता यावा या उदात्त हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
या जन्म शताब्दी समारोहाचे उद्घाटक व सत्कारमूर्ती आमदार विकास ठाकरे हे होते. ‘छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र काल आणि आज या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते शिवश्री डॉ. श्रीमंत कोकाटे, शिवव्याख्याते व जेष्ठ इतिहासकार, पुणे हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ ॲड. फिरदौस मिर्झा नागपूर हे होते. यावेळी सती माता शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व स्व. प्रकाशभाऊ उमाठे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंदाताई उमाठे, सती माता शिक्षण संस्था व साईबाबा लोकसेवा संस्था नागपूर चे सचिव, किशोर उमाठे तसेच साईबाबा लोकसेवा सस्था नागपूर चे अध्यक्ष, ॲड. ओंकार उमाठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. एम.के. उमाठे कॉलेजचे प्राचार्य, डॉ. डि.व्ही. नाईक व कॉलेज ऑफ मल्टिडिसीप्लिनरी स्टडीज, ओंकारनगर, नागपूर चे प्राचार्य, डॉ. देबाशीष भौमिक याच्या मार्गदर्शनात या जन्म शताब्दी सोहळ्याचे आयोजन केलेले होते.

