वाकी येते 21 जानेवारी ते 27 जानेवारी पर्यंत चालणार ताजुद्दीन बाबाचा जन्मोत्सव सोहळा.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर १७ जाने:- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वधर्म समभावाचे प्रतीक श्री ताजुद्दीन बाबांचा 164 वा जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने वाकी दरबार येथे साजरा करण्यात येणार आहे. या जन्मोत्सवा निमित्त 21 जानेवारी ते 27 जानेवारी 2025 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
21 जानेवारीला श्री ताजुद्दीन बाबांच्या पादुकेचा अभिषेक करुन या जन्मोत्सवाला सुरुवात होणार आहे. 22 जानेवारीला दुपारी 12.00 ते 3.00 पर्यंत भजनाचा कार्यक्रम आहे. 23 जानेवारीला सकाळी 9.00 ते 11.00 श्री ताजुद्दीन बाबा स्तोत्राचे सामूहिक पारायण होईल. 24 व 25 तारखेला दुपारी 12.00 ते 3.00 वाजेपर्यंत भजनाचा कार्यक्रम होईल. 26 जानेवारी रविवारला निशुल्क वैद्यकीय शिबिराचे आयोजक करण्यात आले आहे. या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा.
27 जानेवारीला सकाळी 6.00 वाजता जन्मोत्सव सोहळा, झेंडावंदन व चादर चढविण्यात येईल. सकाळी 9.00 ते 12.00 वाजेपर्यंत ह.भ.प. डॉ. सय्यद जलाल महाराज नाशिक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी 12.00 वाजता पासुन महाप्रसादाचा कार्यक्रमाला सुरुवात होईल. तरी बाबांच्या जन्मोत्सव निमित्त हजारो भाविकांनी बाबांचा आशीर्वाद घ्यावा अशी माहिती श्री. बाबा ताजुद्दीन दरबार वाकी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रभाकरजी डहाके पाटील यांनी दिली.

