पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपूर
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे भलतचं कांड समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे. येथे एका व्यापाऱ्याच्या पत्नीने आपल्या पतीला रात्री झोपेच्या गोळ्या देऊन रात्री हॉटेलमध्ये परपुरुषा सोबत रात्र घालवायची. मागच्या काही दिवसांपासून हा प्रकार निरंतर सुरू होता. पण मुलीची तब्येत खराब झाल्याने पत्नीचं हे खळबळजनक कांड उघड पडलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील वर्धा रोडवर असेलल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये नवऱ्याने जीपीएस द्वारे पत्नीचा शोध घेतला आणि तिला रंगेहात पकडलं. ही विवाहित महिला मेजवाण्यांच्या बहाण्यांना रात्री बेरात्री घराबाहेर रहायला लागली. पत्नीच्या या वर्तनामुळे पतीला तिचावर संशय आला. त्यानंतर त्याने तिचा माग काढण्याचं ठरवलं. त्यासाठी व्यापारी असलेल्या पतीने पत्नीच्या गाडीत जीपीएस बसवले.
जसा पतीला संशय आला तसाच संशय पत्नीलाही आला. तिने नवऱ्याला जेवणातून झोपेच्या गोळ्या द्यायला सुरुवात केली. नवरा झोपी गेला ती रात्री बाहेर पडायची आणि हॉटेलमध्येच रात्र घालवायची. इकडे नवरा मात्र झोपलेला असायचा. मात्र काहीच दिवसांआधी तिची मुलगी रात्री झोपेतून उठली. तिचं पोट दुखू लागल्याने ती आईला शोधू लागली. परंतु आई नसल्याने तिने वडिलांना जागवण्याचा प्रयत्न केला.
व्यापारी एवढे गाढ झोपले होते की मुलीच्या उठवण्याने ते उठले नाहीत. शेवटी मुलीने आपल्या काकांना फोन केला आणि ते तडका फडकी आपल्या भावाच्या घरी आले. यावेळी घरी मुलीची आई नव्हती आणि तिचे वडीलांस उठवले असता गाढ झोपेत होते, त्यानंतर भावाला जागं केलं त्यानी तातडीने जीपीएस वरुन आपल्या पत्नीचं लोकेशन काढलं आणि हॉटेल गाठलं. हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी गोपनियतेचं कारण देऊन प्रवेश नाकारला. मात्र व्यापारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी काहीतरी कारण सांगून खोलीत प्रवेश मिळवला.
हॉटेलमध्ये व्यापाऱ्याला त्याची पत्नी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली. हॉटेलमध्ये चांगलाच गदारोळ सुरु झाला. व्यापाऱ्याने पोलिसांमध्ये धाव घेऊन पत्नीची तक्रार घेतली, मात्र मुलीमुळे ती तक्रार मागे घेतली. व्यापारी पतीने पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. या सगळ्या प्रकाराची नागपूरमध्ये लोक चर्चा करीत आहेत.

