संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 21:- गडचांदुर येथील निवासी पंडित शंकरराव काळे यांची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या नागपूर विभाग सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. संस्थेचे संस्थापक राष्ट्रिय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रिय मार्गदर्शक राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष दिपक भवर, सचिव सचीन वाघ, महीला सचिव आसिया रिजवी यांच्या सूचनेनुसार पंडित काळे यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या इंटर नॅशनल ह्युमिनिटी मिशन ऑर्गनाईजेशन या संस्थेमार्फत त्यांना नेल्सन मंडेला ग्लोबल ब्रिलियन्स अवार्ड -२०२२, तसेच व्याख्यान, रोजगारामुख स्वतंत्र उद्योग, व्यसनमुक्ती जनजागरण क्षेत्रातील योगदानाबद्दल महाराष्ट्र रत्न -२०२४ आदीसह अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे. ते राष्ट्रसंत परमपूज्य शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून व्यसनमुक्ती जनजागृती करीत आहे.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या नागपूर विभाग सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे राज्य निरीक्षक रामेश्वर वारकरी, राज्याध्यक्ष बादल बेले, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव बापू परब, महीला राज्याध्यक्षा डॉ. प्रिती तोटावार, उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, सचिव ऋतुजा गवस, सहसचिव रत्ना चौधरी, जनसंपर्क विभाग अध्यक्षा स्वाती सोनवणे , कला सांस्कृतिक नागपूर विभाग अध्यक्षा रजनी शर्मा, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, सूनैना तांबेकर , संतोष देरकर, बबलू चव्हाण आदींनी पंडित काळे यांचे अभिनंदन करीत पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या.

