मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
जय पेरसापेन कृपेनें सौं विजया व श्री शैलेश गेडाम यांचे चिरंजीव यांचा नामकरण सोहळा मोठ्या थाटामाटात राहते घरी देवलमरी रोड काटेपल्ली ता. अहेरी येथे करण्यात आले आहे . प्रत्येक आईवडिलांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अश्या सोहळ्याला निमंत्रणाला मान देत माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी उपस्थित राहून चिमुकल्या बाळास शुभआशीर्वाद दिला आहे . यावेळी उपस्थित सिनूभाऊ वीरगोणवार, ऋषीदादा पोरतेत,अमोलभाऊ मुक्कावार, रामू कस्तुरवार, श्याम मडावी,अनुराग बेझलवार,सुमित मोतकुरवार,सामाजिक कार्यकर्ते उमेश कोरेत, तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व पाहुणे मंडळी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

