मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
गोमणी :-) वर्ग आठवि व वर्ग बारावीच्या संयुक्त विद्यमानाने भगवंतराव कनिष्ठ कला महाविद्यालय गोमणी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष उच्च माध्यमिक शिक्षक श्री सी एन भेंडारकर सर,प्रमुख अतिथी म्हणून श्री एस वाय पथाडे सर,व श्री ऐ जे निखाडे सर उपस्थित होते.राष्ट्रपिता महात्मा गांधी हे सर्वधर्मसमभाव पाडणारे होते.त्यांनी विषमतेला थारा दिला नाही.ईश्वर अल्ला तेरे नाम अशी त्यांची वृत्ती होती असे श्री एस वाय पथाडे सरांनी सांगितले.राष्ट्रपिता महात्मा गांधीजीने आपल्या आयुष्यात अनेक प्रकारचे सत्याग्रह केले असे श्री निखाडे सरांनी सांगितले.तर श्री भेंडार कर सरांनी गांधीजी सत्य अहिंसेचे पुजारी होतेअसे सांगितले. सदर कार्यक्रमात भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय गोमणी येथील श्री लांजेवार सर, श्री ताजणे सर,दयालवर बाबू यांनी आपली उपस्थिती दर्शवीली कार्यक्रमाचे संचालन कुमारी पल्लवी माहूरकर हिने केले.तर आभार कुमारी संध्या मेश्राम हिने केले व कार्यक्रमाला बहुसंख्य महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला .

