*छोटे उस्ताद फेम अंजली गलपाळे ने जिंकले रसिकांचे मन*
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो 9764268695.
बल्लारपूर :- – शहरातील शगुन लॉन समोरिल खुल्या मैदानात आम आदमी पक्षातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधानाच्या सन्मानार्थ एकता कि मशाल महोत्सव वर्ष ४थे मोठ्या जल्लोषात साजरे करण्यात आले. या कार्यक्रमास जनतेची अलोट गर्दी हजारोंच्या संख्येने उपस्थित होती. जनतेचा हा प्रतिसाद बघून शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार तसेच जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार यांनी तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली एक -दीड महिन्याची महिनत सार्थक झाल्याचे दिसून आले. कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्रातील आपचे नेते डाॅ.देवेंद्र वानखेडे, जगजीतसिंह यांची उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून शहरातील ज्येष्ठ पत्रकार वसंतराव खेडेकर जी, मराठा सेवा संघाचे मनोहर माडेकर सर, अनिल वाग्दरकर सर, तसेच प्रा. डाॅ.चौकसे सर, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सलमान खान तसेच शिरीन सिद्दीकी यांनी केले . शहर उपाध्यक्ष अफजल अली यांनी कार्यक्रमाची कार्यक्रमाची प्रस्तावना सांगितली त्यानंतर स्पर्धा परिक्षा शिक्षक रोहित जंगमवार यांनी चंद्रपुरच्या गोंड साम्राज्याचा उपेक्षित इतिहासावर प्रकाश टाकला. सर्व पाहुण्यांची भाषणे झाली ज्यामध्ये प्रमुख अतिथींनी आपच्या कार्यावर स्तुतीसुमने उधळली. शहराध्यक्ष पुप्पलवार यांनी आप ला शहरात नगरपरिषदेवर सत्ता दिल्यास शैक्षणिक व्यवस्थेचा कायापालट करण्याची ग्वाही दिली. यानंतर स्टार प्रवाह चॅनेलच्या छोटे उस्ताद फेम अंजली गलपाळे यांनी छ.शिवरायांवरील पोवाळे व भीम गीतांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात संविधान आर्टिकल स्पर्धेचे 5 बक्षिसांचे वितरण देखील करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महिला अध्यक्ष किरण खन्ना, सलमा सिद्दीकी, मनिषा अकोले, गणेश सिलगमवार, गणेश अकोले, सागर कांबळे, अनिता करमनकर तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत केली.

