सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
बल्लारपूर:- जनता विद्यालय (शहर शाखा) बल्लारपूर येथे दिनांक 28 सप्टेंबर 2022 ला माहितीचा अधिकार दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. आर. आर. निखाडे सर (ज्येष्ठ शिक्षक) तसेच प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक श्री. बी. के. लांडे सर, कुमारी सी. व्ही. धकाते मॅडम (परीक्षा प्रमुख), प्रमुख मार्गदर्शक श्री. आर. के. वानखेडे सर (ज्येष्ठ शिक्षक) जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर यांची मंचावर उपस्थिती होती.
शाळेचे विद्यार्थी कुमारी दिव्यांशी गुडुरु, असद अहमद, दक्ष मोटघरे यांनी माहितीचे अधिकाराबाबत माहिती दिली. कु. मीनाक्षी गुडुरु आणि कु. आर्या मेश्राम यांनी “वीरो को प्रणाम” गीत गायन केले तसेच कुमारी रागिनी कुडे आणि सिद्धांत वाघमारे यांच्या चमुने “बलसागर भारत होवो” हे गीत गायन केले तसेच मानसी गिरडकर आणि चमुने गीत गायन केले.
या कार्यक्रमाला श्री. बी. के. लांडे सर (मुख्याध्यापक) तथा श्री. आर. आर. निखाडे सर (जेष्ठ शिक्षक) यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रमुख मार्गदर्शक श्री. आर. के. वानखेडे यांनी माहितीचे अधिकाराबद्दल माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. बी. डब्ल्यू. बरडे सर, संचालन श्री. ए. एन. नवले सर आणि आभार प्रदर्शन श्री. महेश पानघाटे सर यांनी केले. कार्यक्रम सफल करण्यास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहयोग लाभला.
