अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- समुद्रपूर तालुक्यातील नागपूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील जाम येथे जमदापूर येथील व्यक्तीने कार मधून उतरुन ट्रकच्या समोर उडी घेतल्याने त्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला. श्रीनिवास नर्सिंग्लू सुकनाल वय 35 वर्ष राहणार जमदापूर जिल्हा आदीलाबाद असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार 30 जानेवारी 11.30 वाजताच्या सुमारास मृतक श्रीनिवास नर्सिंग्लू सुकनाल हा आपल्या कुटुंबासह कार क्रमांक TG 01-8009 ने अदिलाबाद वरून प्रयागराज येते जात होते. ते जाम नाजिक हिंगणघाट रोड येथे आल्यावर लघुशंका करण्याच्या निमित्ताने कार रोडखाली उतरून त्याने हैदराबाद कडे जाणाऱ्या अज्ञात ट्रकच्या समोर उडी मारली या अपघातात त्याचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला. पण श्रीनिवास यांनी आत्महत्या का केली याच कारण अजून पर्यंत कळलं नाही.
या अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक भैय्याजी तोडासे यांच्या मार्गदर्शनात हायवे ॲम्बुलन्सने वैद्यकीय स्टाफच्या साह्याने मृतदेह शवविच्छेदनासाठी समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात रवाना करीत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. यासंबंधी समुद्रपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार संतोष शेगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक करीत आहेत.

