*- AAP चे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी कर्मचाऱ्यांना केले आरपीएफ च्या हवाली व स्टेशन प्रबंधकांकडे केली तक्रार.*
सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694
बल्लारपूर;-दि:- 30/01/2025 शहरातील रेल्वे स्थानक शौचालयात रेल्वे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याची तक्रार आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांना मिळाली. तेव्हा त्यांनी सत्य परिस्थिती जानून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आढळले की तेथे बसलेले कर्मचारी प्रवाशांकडून शौचासाठी 20 रुपये तर मुत्रालयासाठी 5 रूपये घेतात. त्यांनी जेव्हा रेल्वे प्रशासनाकडून शौचालयाच्या शुल्काची माहिती घेतली तेव्हा मुत्रालयासाठी कोणतेही शुल्क नाही, परंतु शौचासाठी पाच रुपये शुल्क आकारले जायला पाहिजे अशी माहिती मिळाली, तरीही तिथे बसलेले कर्मचारी प्रवाशांकडून अधिकची वसूली करत आहेत. याची माहिती आप शिष्टमंडळाने रेल्वे उपप्रबंधक यांना दिली असता हे ठेकेदार आणि त्यांचे कर्मचारी आमचं ऐकत नाहीत अशी हतबलता उपप्रबंधक यांनी प्रकट केली. त्यानंतर पुप्पलवार व आप शिष्टमंडळाने या कर्मचाऱ्यांची तक्रार करत आरपीएफ च्या हवाली केले व स्टेशन प्रबंधक यांना याप्रकरणात कारवाई करण्याची मौखिक मागणी केली. यावेळेस शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष प्रा. नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, गणेश अकोले, सरमन बन्सल व कार्यकर्ते उपस्थित होते.

