मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘घर घर संविधान’ हा उपक्रम देशभर शाळा, महाविद्यालयांमध्ये साजरा करण्यात येत आहे. पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोगनबोडी हेट्टी येथे ध्वजारोहण करून भारताचा ७६ व प्रजासत्ताक दिन पार पडला या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांचा आविष्कार व्हावा, विद्यार्थ्यांमधील कलागुणांना अभिव्यक्त करता यावे, त्यांना अभिनयाची संधी मिळावी आणि सांस्कृतिक क्षेत्राचा विकास व्हावा या उद्देशाने सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी समूहनृत्य, एकलनृत्य, लावणी,देशभक्तीपर नृत्य गीत, विनोदी नाटिका प्रदर्शित करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अनिल झुरे सरपंच ग्राम पंचायत मारोडा हे होते तर सहउद्घाटक म्हणून नंदाताई बोरकुटे उपसरंपच ग्राम पंचायत मारोडा हरडे ग्रामसेवक ग्राम पंचायत मारोडा अध्यक्ष संदीप सोमनकर शाळा व्य समिति हे होते.उपाध्यक्ष कर्ती सातपुते.पुरुषोत्तम बोरकुटे भाजपा तालुका अध्यक्ष ओबीसी मोर्चा. शेषराव जुवारे ग्रा. प. सदस्य मरोडा खुशबराव चेन्नुरवार पो पाटील भोगनबोडी दीपक वासेकर भाजपा तालुका महामंत्री ओबीसी मोर्चा सुरेश सातपुते शेतकरी कृषी केंद्र चामोर्शी. विशाल सोमनकर सेतू केंद्र चामोर्शी. नरेश महागमवार रजनीकांत सातपुते प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जिवनदास बारसागडे.विनोद सोमंकर. शरद कुनघाडकर. वर्षा बारसागडे मनीषा गव्हारे. निलिमा चलाख.मीनाक्षी पिपरे मारोती बारसागडे शंकर चलाख मु .अ.श्री नगुलवाऱ सर देवकत्ते सर गावातील नागरिक महिलावर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

