मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
आज दिनांक एक फेब्रुवारी रोजी आलापल्ली येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट महिला मोर्चाच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार तसेच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरे तसेच महिला आयोगाचे अध्यक्षा रूपालीताई चाकणकर तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व माजी कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम,जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात महिला जिल्हाध्यक्ष पुष्पाताई अलोणे यांच्या मार्गदर्शनात व सारिका ताई गडपल्लीवार तालुकाध्यक्ष अहेरी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाला आलापल्ली परिसरातील शेकडो महिलांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या कार्यक्रमात वृद्ध व विधवा महिलांचा हळदीकुंकू लावून सन्मान करण्यात आला.
” विधवा महिलांचा समाजात योग्य सन्मान झाला पाहिजे त्यांना सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे. पूर्वीच्या काळी महिलांवर खूप मोठे बंधन होते परंतु आता महिला शिकल्या आणि पुढे गेलेल्या आहेत त्यामुळे महिलांनी स्वतःला कोणत्याही क्षेत्रात कमी लेखू नये.” हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सर्वांशी संवाद साधण्याचा मला संधी दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानत तनुश्री ताईंनी उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून तनुश्रीताई धर्मराव बाबा आत्राम प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पाताई अलोणे महिला जिल्हा अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट),सारिका ताई गडपल्लीवार महिला तालुका अध्यक्षा, निर्मलाताई कांबळे सरिता ताई निमसरकर यांच्यासह शेकडून महिलांनी कार्यक्रमाला हजर लावली होती.

