*राजाराम येथील बी, एस एन एल.सेवा विस्कळीत सुरळीत करण्याची मागणी*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
राजाराम (खां)
अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला येथे गेल्या दोन, तीन महिन्यापासून बी एस एन एल सेवा सातत्याने खंडित होत असून ही नेहमीचीच डोकेदुखी झाली आहे.
शाळेय व कार्यालयीन कामकाज आज घळीला संपूर्ण ऑनलाईन असून अशा महत्त्वपूर्ण कामकाजात खूप मोठी अडचण निर्माण होत आहे.याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष करीत असून नागरिकात संताप व्यक्त केल्या जात आहे.या परिसरात राजाराम, खांदला, पत्तीगांव, कोत्तागुडम, चिरेपल्ली, मरनेल्ली, कोंकापल्ली, सूर्यपल्ली, रायगट्टा, इत्यादी गावाचा समावेश असून कित्येक वर्ष्यापासून बी, एस, एन. एल. सिम उपयोगात आणत असून सध्या स्थितीत सिमधारकांना घरका ना घाटका होऊन बसला आहे.तात्काळ सुरळीत करण्याची मागणी परिसरातील मोबाईल धारकांनी जोर धरीत आहे.

