अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- ३१ जानेवारीला चतुर्मुख शिवब्रम्हलिंग जलधारी यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम सारस्वतपूर सावनेर मध्ये चतुर्मुख ब्रह्मज्योती लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ब्रह्मज्योतीय चतुर्मुख लिंगाची प्रतिमा जलामध्ये विराजमान असून मनुष्यांच्या अनेक मनोकामना पूर्ण होण्याकरिता या ब्रह्मज्योती लिंगाच्या दर्शनांनी होत आहे.
३ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी पर्यंत श्री.प्रभु विश्वकर्मा मंदिर येथे श्री.प्रभू विश्वकर्मा जयंती निमित्त तसेच प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ मेळाव्याचे औचित्य साधून श्री. शिवमहापुराण अमृतकथे चे आयोजन करण्यात आले. व्यासपीठाचार्य गुरुवर्य ह भ प अनिल महाराज आहेर यांच्या मुख वाणीतून शिव कथेचे महत्त्व सांगत आहे. तसेच विश्र्वशांती व विश्वातील वैकुंठवासी झालेले मनुष्य यांच्या आत्म्याला शांती मिळावी व प्रसन्नतेचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता आयोजन करण्यात आलेले आहे.
सोमवार दि.१० फेब्रुवारीला सकाळी ७ वा.श्री प्रभू विश्वकर्मा यांचा अभिषेक सोहळा होईल.९ वा.पालखी मिरवणूक निघेल. दुपारी १२ ते ३ पर्यंत किर्तनकार प.पु.गुरुवर्य ह.भ.प.अनिल महाराज आहेर नागपूर यांचे काल्याचे किर्तन होईल. किर्तनानंतर लगेच महाप्रसाद दुपारी ४ ते ९ वाजेपर्यंत राहील व कार्यक्रमाची सांगता होईल. जास्तीत जास्त भाविक मंडळींनी किर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक प. पु.गुरुवर्य श्री. सेनाड महाराज व श्री.प्रभू विश्वकर्मा विकास मंडळ सावनेर यांनी केले आहे.

