अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आरोपी दशरथ साळवे यांना जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांनी दि.२२ एप्रिल २०२४ रोजी मतिमंद महिलेवर बलात्कार प्रकरणी आरोपीला १० वर्ष सक्षम कारावास व २ लाख रुपये दंड ची शिक्षा थोटावली होती. सदर निर्णयाविरोधात आरोपी यांनी उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे अपील दाखल केली. उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर यांनी आरोपी दशरथ तातोबा साळवे यांना पुराव्याच्या अभावी दि.३१ जानेवारी २०२५ रोजी निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपी तर्फे ॲड.करण बिहाउत आणि ॲड. घनश्याम दानी यांनी बाजू मांडली.

