प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा ,दि.6:- तीर्थक्षेत्र दर्शनवारी करण्याचे जेष्ठ नागरिकांचे स्वप्न व इच्छा असते. ही इच्छा पुर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने 60 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी “तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत भारतातील 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांच्या दर्शनाचा लाभ मिळवून देण्यासाठी सामाजिक न्याय विभाग वर्धा यांच्या मार्फत अर्ज मागविण्यात आले होते. यातील बौध्द गया या तीर्थस्थळासाठी अर्ज केलेल्या जिल्ह्यातील 197 जेष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली होती. काही कारणास्तव 92 नागरिक उपस्थित न झाल्यामुळे 105 नागरिकांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत सेवाग्राम रेल्वे स्टेशन येथून गौरव भारत रेल्वेने बौध्द गया येथे रवाना करण्यात आले.
चंद्रपूर येथून निघालेली गौरव भारत रेल्वे सेवाग्राम स्टेशनवर सायंकाळी 7.45 दरम्यान पोहोताच समाज कल्याण विभागाच्या अधिका-यांनी स्वागत करुन वर्धा येथील 105 जेष्ठ नागरिक लाभार्थी व लाभार्थ्यांच्या सहकार्यासाठी समाज कल्याण कार्यालयातील कर्मचारी सुजाता पाटील, प्रमिला साटोणे, भाग्यश्री दांडगे, विजय भगत, कल्याणी राऊत, अमोल चक्रनारायण, हितेश वैद्य, किरण बोरकुटे यांनाही बौध्द गया येथे रवाना करण्यात आले.
सदर तीर्थदर्शन योजना सामाजिक न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी रेल्वे अंर्तगत तीर्थस्थळाच्या प्रवासासाकरीता राज्य शासनाने रेल्वेच्या आयआरसीटीसी या कंपनीची निवड करण्यात आली असून कंपनी मार्फत रेल्वे प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी संशोधन अधिकारी अंकेश केदार, विजय कामडी सहाय्यक लेखाधिकारी, गृहपाल सुरज छाडी, गोपाल अनासाने, राजेश नाई, निकेश डिंगलवार, शरद निबुधे, अखिल चांदुरकर, नितीन पाटील, मनोज पाटील, सचिन राऊत जितेश हटेल, आशिष खांजोडे, सुवास लिहितकर, श्री. झिल्पे, श्री. मते, श्री. पतेलकर, श्री. मिनेश ढाक, निशांत वाघमारे, अश्विनी दवने, शोभा ठाकरे, प्रियंका महत्वानी, प्रज्ञा, सोनडवले आदी उपस्थित होते.