प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा दि.8:- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 वी करिता शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा राज्यभरात रविवार 9 फेब्रुवारी रोजी होत आहे. सदर परीक्षा वर्धा जिल्ह्यातील 77 केंद्रांवर होणार असून, यामध्ये जिल्ह्यातील 9489 विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत.
शिष्यवृत्ती परीक्षा ही स्पर्धा परीक्षेची पहिली पायरी असल्याने विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा परिषद शाळांसाठी “मिशन स्कॉलरशिप उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्याचा मागील वर्षी निकालाचा टक्का वाढला आहे.
रविवार 9 फेब्रुवारी रोजी दोन पेपर होणार असून पहिला पेपर सकाळी 11 ते 12.30 या वेळेत प्रथम भाषा व गणित तर दुसरा पेपर दुपारी 2 ते 3.30 या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणीचा होईल. या परीक्षेसाठी जिल्ह्यात इयत्ता
पाचवीचे 47 तर इयत्ता आठवीसाठी 30 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहे. परीक्षेसाठी जिल्हा परिषदेकडून संबंधित तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्फत भरारी पथक तयार करण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे व परीक्षेची तयारी पूर्णत्वास आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ नितु गावंडे यांनी दिली.

